प्रेमविवाहास मदत करणा-या तरुणावर चाकू हल्ला

On: June 20, 2023 7:42 PM

जळगाव : बहिणीच्या प्रेमविवाहास मदत करणा-या तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना आज चोपडा शहरात घडली. आकाश संतोष भोई असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भितीपोटी दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. दरम्यान आज दुपारी घडलेल्या या घटनेने चोपडा शहरात काही वेळ खळबळ माजली.

चोपडा शहरातील साने गुरुजी कॉलनी परिसरात राहणा-या एका तरुणासोबत एका तरुणीने प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाचा मुलीच्या भावाला राग होता. याशिवाय या विवाहाला मदत करणा-या आकाश भोई याच्यावर देखील मुलीच्या भावाचा राग होता. दरम्यान आकाश भोई हा चोपडा शहरातील साने गुरुजी कॉलनीत आला असल्याची माहिती मुलीच्या भावाला मिळाल्यानंतर पाच ते सहा जणांनी मिळून आकाशवर हल्ला केला.

या घटनेत आकाशवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात आकाश जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला चोपडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment