पाचोरा शहरात एक दुजे के लिए ची पुनरावृत्ती

On: June 26, 2023 10:33 AM

जळगाव : पाचोरा शहरातील मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगलाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. जितेंद्र राजु राठोड (19) आणि साक्षी सोमनाथ भोई (18) असे विशीच्या आतील अर्थात टीन एजर आत्महत्या करणा-या युगलाचे नाव आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली. अशा प्रकारच्या घटना आणि प्रेम प्रकरणे समाजासाठी निश्चितच चिंताजनक असल्याचे या घटनेच्या निमित्ताने म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment