जेवण उशिरा दिल्याचा राग – पत्नीवर प्राणघातक हल्ला

On: July 1, 2023 9:03 AM

जळगाव : जेवण उशिरा दिल्याचा राग आल्याने पत्नीच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण तुकाराम बुंदे असे जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील संशयीत आरोपी पतीचे नाव आहे.

शेवंताबाई रामकृष्ण बुंदे आणि रामकृष्ण तुकाराम बुंदे असे झटापटीत जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. 23 जून रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी 30 जून रोजी पहुर पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.न. 233/23 भा.द.वि. 307, 309 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment