एमपीडीए कायद्याखाली दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रकाश चंद्रकांत कंजर (रा. खंडेराव नगर जळगाव) आणि भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनु रामेश्वर पांडे अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

प्रकाश कंजर याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला हातभट्टीचे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (इ) नुसार एकुण आठ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय रामानंद नगर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध तिन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरात राहणारा सोनु रामेश्वर पांडे याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात आर्म अ‍ॅक्टचा समावेश आहे. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. रामानंद नगर, भुसावळ शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईकामी सहभाग घेतला आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here