मोटार सायकलचा कट लागल्याच्या वादातून खून

On: July 8, 2023 10:36 AM

जळगाव : मोटार सायकलचा कट लागण्याच्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील रंवजे या गावी 7 जुलै रोजी सकाळी आठ वाजता घडली. या घटने प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव अशोक कोळी असे मयत तरुणाचे नाव आहे.

लक्ष्मण अशोक कोळी, राजु सुकदेव माळी, भैय्या सोमनाथ कोळी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील तिघा संशयीत आरोपींची नावे आहेत. मयत नामदेव याचा भाऊ सुभाष अशोक कोळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 127/23 भा.द.वि. 302, 435, 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 जुलै रोजी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून नामदेव उर्फ रावण आणि त्याचा मित्र अक्षय शांताराम कोळी या दोघांचा संशयितांसोबत हिंसक वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी सुभाष हा पुढे आला असता त्याच्या डाव्या हातावर दुखापत करण्यात आली. नामदेव याच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. सतिष गोराडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment