जळगाव : जामनेर शहराच्या शास्त्री नगर परिसरात राहणा-या सेवानिवृत्त बस कंडक्टरच्या बंद घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय कंडक्टरच्या घरात दवाखाना चालवणा-या डॉक्टरच्या दवाखान्यात देखील चोरट्यांनी आपली हातकी सफाई दाखवली आहे. निवजत्ती माधव चौधरी या सेवानिवृत्त बस कंडक्टरच्या घरात हा घरफोडीचा प्रकार झाला आहे. त्यांच्याच घरात अविनाश चितामन कुरकुरे हे डॉक्टर आपला वैद्यकीय व्यवसाय चालवतात. त्यांच्या दवाखान्यातील मेडीकल किट देखील चोरट्यांनी नेली आहे.
12 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा, 13 ग्रॅम वजनाची सोन्याच्या पोतमधील मणी, तिन हजार रुपये किमतीची मेडीकल किट, तिन लाख रुपये रोख असा एकुण 3 लाख 64 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक गणेश अहिरे पुढील तपास करत आहेत.