प्रेमसंबंध खंडीत केल्याचा राग – विनयभंगासह मारहाण, धमकी  

On: July 20, 2023 9:22 AM

जळगाव : प्रेमसंबंध सुरु ठेवण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकाने महिलेचा विनयभंग तसेच इतर दोघांनी मारहाणीसह धमकी दिल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर येथील पिडीत महिलेचे एका जणासोबत गेल्या तिन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र यापुढे तिने प्रेमसंबंध सुरु ठेवण्यास राग आल्याने हा प्रकार घडल्याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे.

जामनेर शहरात खासगी नोकरी करणारी एक महिला राहते. तिचे जामनेर पुरा परिसरात राहणा-या एका जणासोबत गेल्या तिन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र तिने त्याला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. यामुळे त्याने तिला शिवीगाळ करत मी तुला आता सोडणार नाही असे म्हणत तिला अंगावर ओढून घेत तिचा विनयभंग केला. याशिवाय तिला विविध अश्लिल शिवीगाळ केली. हातातील विटेने तिच्या डोक्यात मारुन तिला दुखापत देखील केली. त्याच्यासोबत असलेल्या दोघा महिलांनी तिला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत तु आमच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. यातील एकीने तुझे फोटो आमच्याकडे आहे. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. याप्रकरणी तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. जयेंद्र पगारे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment