अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती तरुणाच्या खूनाचा गुन्हा दाखल

On: July 22, 2023 9:47 AM

जळगाव : अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने अमळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुण हा दगडावर पडून मरण पावल्याचा बनाव करुन पोलिसांना व नातेवाईकांना खोटी माहिती देत करण्यात आलेला बनाव पोलिसांनी उघड केला आहे. या घटनेप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती.

22 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री दरम्यान  अमळनेर शहरातील सुजान मंगल कार्यालयाजवळ असलेल्या बगीच्यानजीक असलेल्या साई हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली होती. दगडू नारायण पाटील असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत दगडू पाटील हा सुरत येथील मुळ रहिवासी होता. नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (रा. माळीवाडा अमळनेर) या संशयीत तरुणाविरुद्ध या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश ढिकले करत आहेत. संशयीत आरोपी नरेंद्र चौधरी यास अटक करण्यात आली आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment