गृहीणीचा विनयभंग करणा-याविरुद्ध गुन्हा

On: July 22, 2023 10:37 AM

जळगाव : गृहीणीचा विनयभंग तसेच तिच्या वडीलांना मारहाण करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल आत्माराम भोई असे गुन्हा दाखल तसेच अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पारोळा बस स्थानका नजीक या घटनेतील गृहीणी आपल्या वडीलांसह आली होती. त्यावेळी गृहीणीने अनिल भोई यास तुमची गाडी मागे घ्या मला गाडीत सामान ठेवायचे आहे असे म्हटले. त्यावेळी अनिल भोई याने गृहीणीस अश्लिल शब्दात बोलून अवमान केला. पावसाचे दिवस असून माझे सामान ओले होईल तरी गाडी मागे घ्या असे गृहीणीने विनंती केल्यानंतर देखील त्याने तिचा हात धरुन अश्लिल कृत्य तसेच मारहाण केली. दरम्यान गृहीणीचे वडील तिच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांना देखील मारहाण व धमकी दिल्याचा गृहीणीचा आरोप आहे. याप्रकरणी अनिल भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. नाना पवार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment