तृतीयपंथीवर अनैसर्गीक अत्याचार – पाच जणांविरुद्ध गुन्हा

On: July 23, 2023 5:04 PM

जळगाव : भिक्षा मागून चरितार्थ करणा-या तृतीयपंथीवर अनैसर्गीक अत्याचार तसेच बळजबरी पैसे हिसकावल्याप्रकरणी भुसावळ येथील चौघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील बंटी पथरोड, फज्जो उर्फ सोनी पथरोड, माया डॉन नावाचा इसम आणि हर्षल पाटील तसेच जितु नावाचा तृतीयपंथी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

या घटनेतील बंटी पथरोड याने तृतीयपंथीवर अत्याचार केला. याशिवाय बंटीची पत्नी आणी इतर तिघांनी मिळून तृतीयपंथीकडील पंधराशे रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. दररोज सातशे रुपयांची बाटा खंडणी दिली नाही म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. मंगेश गोंटला करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment