चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

On: July 30, 2023 8:17 PM

जळगाव : मुक्ताईनगर, मलकापूर, सुरत अशा विविध ठिकाणी मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणा-या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर रामदास कोळी असे मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेल्या अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे बोदवड पोलिस स्टेशनसह इतर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

मुक्ताईनगर येथील सागर रामदास कोळी हा चोरीची मोटार सायकल वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील हे.कॉ.  दिपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, पोना किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी चापोकॉ मोतीलाल चौधरी आदींना पुढील तपास व कारवाईकामी रवाना केले होते.

या तपास पथकाने मुक्ताईनगर येथील श्रीराम नगर परिसरातून यास ताब्यात घेत चौकशी त्याची चौकशी केली. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुल दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बोदवड, मुक्ताईनगर, मलकापूर शहर, सुरत (गुजरात – खटोदरा) आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीच्या पाच मोटार सायकली त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपासकामी त्याला बोदवड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment