डीलरशिप देण्याचे आमिष – वकीलाची दहा लाखात फसवणूक

जळगाव : इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत 10 लाख 80 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला नाशिक जिल्ह्याच्या शिरसगाव ता. निफाड येथील पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दिनकर जिवरक आणि महेश संजय जिवरक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिता पुत्राचे नाव आहे.

कासोदा येथील वकील वासुदेव वारे यांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी वाहनांचे शोरुम टाकण्यासाठी चार्जिंगच्या वीस इलेक्ट्रीक दुचाकी आणि डिलरशिप मिळवून देण्यासाठी जिवरक पिता पुत्रांनी वासुदेव वारे यांच्याकडून 10 लाख 80 हजार रुपये घेतले. मात्र आजपावेतो त्यांना गाड्या अथवा डिलरशिप दिली नाही. त्यामुळे दोघा पिता पुत्राने मिळून संगनमताने विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. योगिता नारखेडे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here