अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर अटकेत

On: August 24, 2020 9:13 AM

मीरा रोड : सेजल शर्मा या अभिनेत्रीने जानेवारी महिन्यात आपल्या बेडरुममधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. सेजल शर्मा ही अभिनेत्री टीव्हीवरील मालीका व जाहिरातीत काम करत होती. दिल्लीत राहणारा तिचा प्रियकर आदित्य वशिष्ट यास पोलिसांनी अटक केली आहे.

आपण आत्महत्या करणार आहोत असे सेजल शर्मा हिने आदित्य यास कळवले होते. तशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती. आपल्याकडे अद्भुत शक्ती आहे व त्या शक्तीच्या माध्यमातून मुख्य भुमिका मिळवून देतो असे आमिष त्याने सेजल शर्मा हिला दाखवले होते.

या आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम व त्यांचे सहकारी करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment