आयपीएलने गमावला बडा स्वदेशी स्पॉन्सर

On: August 24, 2020 2:34 PM

इंडियन प्रीमियर लीगवरील संकटांची मालिका सुरुच आहे. आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप साठी नवा स्पॉन्सर मिळाला नसतांना आता बीसीसीआयसमोर एक पेच तयार झाला आहे. आईपीएल असोसिएट सेंट्रल स्पॉन्सरशिप मधून फ्यूचर ग्रुप वेगळा झाला आहे.पाच वर्षांपासून फ्यूचर गृप हा आयपीएलसमवेत रहात होता.

यावेळी फ्युचर गृपने लीगसोबत असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या वेबसाईटवरील फ्यूचर गृपचे नाव कमी करण्यात आले आहे. त्यामुळे बोर्डाला आता नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. फ्यूचर गृपने मध्येच आयपीएलची साथ सोडल्यामुळे बीसीसीआय कंपनीवर मोठा दंड आकारण्याची दाट शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment