पाच वर्षाच्या बालिकेची बापाने केली हत्या

जळगाव : फैजपूर नजीक न्हावी शिवारात पाच वर्षाच्या बालिकेच्या हत्येप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठुशा बारेला असे हत्या झालेल्या बालिकेचे नाव आहे. ठुशा भावला बारेला असे बालिकेची हत्या करणा-या बापाचे नाव आहे. 17 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की कु. अनिता बारेला या बालिकेस दवाखान्यात घेवून जातो असे सांगून तिचा बाप ठुशा बारेला तिला घेवून गेला. बालिकेला दवाखान्यात न नेता त्याने न्हावी शिवारातील धिरज चौधरी यांच्या शेतातील विहीरीत फेकून जिवे ठार केले. बालिकेचे आजोबा छंडा वेरला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस स्टेशनला ठुशा बारेला याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. निलेश वाघ पुढील तपास करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here