गळफास घेणा-या बाल सुधारगृहातील बालिकेचा मृत्यू

On: August 23, 2023 11:27 AM

जळगाव : बाल सुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षणगृहातील चौदा वर्षाच्या बालिकेने गळफास घेतल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. पुनम सुरेश भिल असे या बालिकेचे नाव आहे. मयत पुनम भिल ही बालिका अमळनेर येथील रहिवासी होती.

पुनम भिल या बालिकेने 12 ऑगस्ट रोजी गळफास घेतला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरु असतांना 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. मीरा देशमुख करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment