एमपीडीए कायद्याखाली भुसावळचा आतिष खरात स्थानबद्ध

On: August 25, 2023 2:42 PM

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली भुसावळ येथील गुन्हेगार आतिष रवींद्र खरात याच्या विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीत समता नगर परिसरात राहणा-या आतिष खरात याला पुणे येथील मध्यवर्ती येरवडा कारागृहात दाखल केले जाणार आहे. त्याकामी त्याला घेवून पोलिस पथक रवाना झाले आहे.

आतिष खरात याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ल्यासह एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्याकयाविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह भुसावळ पोलिस स्टेशनचे पो.नि. गजानन पडघन, स.पो.नि. अनिल मोरे आदींनी या कारवाईकामी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment