पंधरा हजारांची लाच – सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

On: August 25, 2023 3:11 PM

जळगाव : पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी  रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिन पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्तावर त्यांची मोटार सायकल अडवून थांबवले होते. तुमच्या जवळ गांजा आहे असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे त्यांना सांगण्यात आले होते. सांगितले. तुमच्याजवळ गांजा असून तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची आहे. जर  गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले होते.

तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटे चार वाजेच्या सुमारास तिस हजार रुपये घेण्यात आले मात्र मोटार सायकल ठेवून घेतली. मोटार सायकल सोडवायची असल्यास राहिलेले विस हजार रुपये आम्हास द्यावेलागतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर दि. 24 ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे गांजाची केस न करण्यासह मोटार सायकल सोडवण्यासाठी विस हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती पंधरा हजार रुपये पंचासमक्ष सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यांनी घेतले. त्याचवेळी एसीबी पथकाने कारवाई केली. याप्रकरणीचोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा तपास अधिकारी सुहास देशमुख यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना  पो.नि. एन.एन.जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.सचिन चाटे आदींचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment