जबरी चोरी करणा-यास अटक

On: August 28, 2023 8:16 PM

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शेख शाकिब शेख दाऊद असे भुसावळ येथील जाम मोहल्ला परिसरतील रहिवासी आरोपीचे नाव आहे. चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे शेख शाकिब याने कबुल केले आहे. त्याच्या अटकेमुळे जबरी चोरीचा चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी शेख शाकिब यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment