रोहा बलात्कार खटला ; अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती

On: August 24, 2020 7:23 PM

रायगड : रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. या गुन्हयाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर 26 जुलै रोजी आरोपीकडून बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या दुर्दैवी घटने प्रकरणी तात्काळ दोषारोप पत्र दाखल करुन दाखल करुन जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment