शरीरसंबंध ठेवत नसल्याच्या रागातून महिलेवर प्राणघातक हल्ला

On: September 1, 2023 8:38 AM

जळगाव : आपल्याशी बोलत नाही तसेच गेल्या तिन वर्षापासून शरीरसंबंध ठेवत नाही या कारणावरुन महिलेवर एकाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिलेचा बचाव करण्यासाठी आलेल्या दोघांवर देखील हल्ला झाला. या हल्ल्यात महिलेसह दोघे जण देखील जखमी झाले आहेत.

चिनावल परिसरातील एका शेताच्या बांधावर एका महिलेची तिच्या परिचिताने वाट अडवली. तु माझ्याशी का बोलत नाही. गेल्या दोन ते तिन वर्षापासून तु माझ्यासोबत शरीरसंबंध देखील ठेवत नाही असे म्हणून त्याने तिच्याशी वार्तालाप केला. दरम्यान अगोदरच संतापात असलेल्या महिलेच्या त्या परिचिताने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ती जबर जखमी झाली. तिच्या बचावासाठी आलेल्या दोघांवर देखील त्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शांताराम पाटील करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment