भुसावळचा गुन्हेगार निखील राजपूत याची हत्या

On: September 2, 2023 8:11 AM

जळगाव : भुसावळ नजीक कंडारी येथे दोघा भावांच्या हत्येच्या तपासात पोलिस पथक गर्क असतांना भुसावळ शहरातील गुन्हेगार निखील राजपूत याची देखील हत्या झाल्याचा प्रकार रात्री उघडकीस आला आहे. या घटने प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहराच्या चमेली नगर परिसरात निखील राजपूत हा झोपला असतांना झालेल्या हल्ल्यात तो ठार झाला. भुसावळ नजीक कंडारी येथे दुहेरी खून आणी भुसावळ शहरातील निखिल राजपुत याचा खून असे एकुण तिन खून झाल्याने भुसावळ तालुक्यात खळबळ माजली आहे. मयत निखील राजपूत याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment