शेताच्या कुंपणात विजप्रवाह सोडल्याने मजुराचा मृत्यू

On: September 6, 2023 8:19 AM

जळगाव : शेताच्या कुंपनात ठिकठिकाणी लाकडे ठोकून त्यात विज प्रवाहाचे तार सोडल्याने त्याला स्पर्श होवून मजूराचा मृत्यू झाला. विशाल गोपी चिरावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान विठोबा वाणी याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान विठोबा वाणी याने नशिराबाद येथील रहिवासी दिलीप कुलकर्णी यांच्या नफ्याने घेतलेल्या शेतात असलेल्या तार कुंपनात ठिकठिकाणी लाकडे ठोकून त्यात तारा लावून त्यात विजेचा प्रवाह सोडला होता. या विज प्रवाहामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहिती असून देखील विज प्रवाह सुरुच ठेवण्यात आला आणि नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना सफाईचे काम करु दिले. त्यात साई सिद्धी इनव्हायरो या नाशिकच्या खासगी कंपनीतील मजुरीने काम करणारा मजूर विशाल गोपी चिरावंडे हा ठार झाला. याप्रकरणी मयत विशालचे काका विनोद चिरावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment