नवजात अर्भक मुलीची मुखात तंबाखू घालून हत्या

On: September 13, 2023 8:02 AM

जळगाव : अगोदर दोन मुली असतांना तिसरी मुलगी झाल्याने नवजात अर्भक मुलीची तिच्या मुखात तंबाखू घालून तिला झोक्यात घालून जीवे ठार केल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने समाजमन सुन्नाझाले आहे. एकीकडे शासन “बेटी बचाव बेटी पढाव” चा नारा देत असतांना नवजात अर्भकाचा झालेल्या खून प्रकरणी समाजमन ढवळून निघाले आहे.

जामनेर तालुक्यातील हरीनगर तांडा वाकोद येथील रहिवासी गोकुळ गोटीराम जाधव यास दोन मुली आहेत. त्याला तिसरा मुलगा हवा होता. मात्र त्याला तिसरी देखील मुलगी झाली. त्यामुळे त्याने त्या अर्भक मुलीच्या मुखात तंबाखू टाकली. तसेच तिला झोक्यात टाकून तिला ठार केले. या घटनेची वाच्याता होऊ नये म्हणून तिचा मृतदेह गावाच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या शेजारी खड्डा खोदून त्यात पुरला. या घटनेप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप कुमावत यांनी या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.        

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment