ढिगा-याखाली चिमुकला सुखरुप
रायगड (महाड) : महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला भागात काल सायंकाळी पाच मजली इमारत कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोघे जण मृत्युमुखी पडले असून पंधराहून अधिक जण अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेला सलग १९ तास उलटून गेले आहेत.
असे असले तरी चार वर्षाचा एक चिमुकला मात्र सुरक्षीत राहिला. त्या चिमुकल्याची यशस्वीरित्या सुटका झाली व त्याला जिवदान मिळाले आहे. जाको राखे साईया मार सके ना कोई अर्थात देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यया घटनेतून आला आहे. चार वर्षांच्या मोहम्मद बांगीला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी बिल्डर फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिकेचे अधिकारी अशा सर्व जणांची एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या घटनेतील दोषींवर सक्त कारवाई केली जाणार आहे.