अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

On: September 14, 2023 8:40 AM

जळगाव : जळगाव शहरातील मुलांच्या निरीक्षणगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बालगृहातील प्रवेशीत 13 वर्ष 7 महिने वयाच्या अल्पवयीन मुलाने 10 वर्ष 9 महिने वयाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेची वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी पिडीत मुलास देवून हे अघोरी कृत्य करण्यात आले आहे. या घटने प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मिरा देशमुख करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment