प्रियकराच्या पत्नीला प्रेयसी महिलेने मागितली तिन लाखांची खंडणी

On: September 15, 2023 9:04 AM

जळगाव : तुझ्या पतीसोबत सुरु असलेले माझे गैर संबंध बिनबोभाट सुरु राहू दे अन्यथा तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अथवा मला तिन लाख रुपये दे अशी संबंधीत प्रेयसी महिलेने विवाहीतेला धमकी दिल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक या गावी एका विवाहीत महिलेच्या पतीचे त्याच परिसरात राहणा-या एका महिलेसोबत गैर संबंध असल्याचे म्हटले जात आहे. गैर संबंध असलेल्या त्या प्रेयसी महिलेने तिच्या प्रियकराच्या पत्नीला धमकी दिली की माझे व तुझ्या पतीचे गैर संबंध जसे सुरु आहे तसे सुरु राहू दे. अन्यथा मी तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन. अथवा मला तीन लाख रुपये दे.

या विवाहीतेच्या नातेवाईक महिलेला देखील या प्रेयसी महिलेने मारहाण करुन आमच्यात हस्तक्षेप करायचा नाही अशी धमकी दिली. आमच्या दोघांमधे आलात तर मी आत्महत्या करेन आणि तुझे नाव जाहीर करेन अशी धमकी या प्रेयसी महिलेने विवाहीतेच्या नातेवाईक महिलेस दिली आहे. आपल्या पतीसाठी जीव ओवाळून टाकणा-या या प्रेयसी महिलेविरुद्ध विवाहीत महिलेने निंभोरा पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment