चाकूचा धाक दाखवत विवाहीतेवर बलात्कार, पतीसह मुलावर चाकूहल्ला

On: September 16, 2023 8:59 AM

जळगाव : चाकूचा धाक दाखवत एकाने विवाहीतेवर बलात्कार तर बलात्कार करणा-या इसमासह त्याचा बाप आणि भावाने विवाहीतेच्या पतीसह मुलावर हल्ला केल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल असून त्यात बाप आणि दोघे मुले यांचा समावेश आहे.

धरणगाव तालुक्याच्या एका गावात संबंधीत विवाहीता 12 सप्टेबरच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत होती. त्यावेळी रामजी नामक इसमाने मागच्या दरवाज्याने घरात प्रवेश करत विवाहीतेला चाकूचा धाक दाखवला अशी संबंधीत फिर्यादी विवाहीतेची तक्रार आहे. विवाहीतेने म्हटल्याप्रमाणे चाकूच्या धाकावर रामजीने तिच्यावर जबरी अत्याचार केला. विवाहीतेने आरडाओरड केल्यानंतर तिचा पती आणि मुलगा असे दोघेजण धावत आले. त्यावेळी विवाहीतेवर अत्याचार करणा-या रामजी याने तिच्या पतीवर चाकू हल्ला करुन त्याला जखमी केले. घराच्या अंगणात रामजीचे वडील व भाऊ या दोघांनी लाकडी दांडा व कु-हाडीने विवाहीतेच्या पती व मुलाला मारहाण करुन जखमी केले. विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment