बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन

On: August 25, 2020 7:56 PM

गोवा : गाजलेल्या वादग्रस्त रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेतील बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी यास पणजी सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये व तत्सम रकमेच्या व्यक्तीगत बॉंडवर त्याला हा जामीन मंजूर झाला आहे. हणजुण येथे त्याच्या मालकीचा बंगला आहे. पुढील सहा महिने त्याला हणजुण येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पंधरा दिवस त्याने क्राइम ब्रॅंचमध्ये हजेरी लावावी, तपासकामी योग्य ते सहकार्य करावे, पासपोर्ट जमा करावा आणि सहा महिने हणजुणला जायचे नाही अशी विविध अटीवर त्याचा जामीन मंजुर करण्यात आला आहे. कपिल झवेरी याच्या हणजुण येथील ‘फिरंगी व्हिल्ला’ या बंगल्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्तर रात्री हा रेव्ह पार्टीचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकत २३ जणांना अटक करण्यात आली होती. यात तीन विदेशी महिलांचाही समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment