गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान मारहाण – सात जणांविरुद्ध गुन्हा

On: September 29, 2023 8:24 AM

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिसांसोबत हुज्जतबाजीसह आपापसात लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला.

जळगाव शहरातील कोर्ट चौक परिसरापासून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होण्याच्या वेळी दोन गटात हा वाद झाला. आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलस सोनवणे, गौरव साखला, गोविंद पंडीत, अजय गांधी, सागर भिमराव सोनवणे (पहेलवान) अशा सात जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार संगिता खांडरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment