गाव सोडून जाण्याची धमकी – तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

On: September 29, 2023 12:08 PM

जळगाव : चापटा बुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करत गाव सोडून जा अशी धमकी मिळाल्याने विहीरीत उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चितोडा ता. यावल येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुर्गेश संतोष किनगे असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. 28 सप्टेबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत तरुण दुर्गेश किनगे यास रजनी भास्कर जंगले, भास्कर आनंदा जंगले, रेखा भुषण जंगले, भुषण भास्कर जंगले व ज्ञानेश्वर भास्कर जंगले आदींनी दुर्गेश यास शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद त्याचे वडील संतोष किनगे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अविनाश दहीफळे करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment