भुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून

On: August 26, 2020 6:19 AM

जळगाव : भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात एका 38 वर्षाच्य तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. मध्यरात्री अकरा वाजेनंतर झालेल्या या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. हल्लेखोर साधारण चार ते पाच संखेत असावे असा अंदाज लावला जात आहे. हा खूनी हल्ला का झाला याचा तपशिल मिळू शकला नाही.

भुसावळ शहराच्या श्रीराम नगर भागातील विलास चौधरी असे गोळीबारात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत विलास चौधरी यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या तरुणावर पुर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असावा अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान फरार मारेक-यांचा कसून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment