अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतांना व्हिडीओ  – तरुणाविरुद्ध गुन्हा  

On: October 6, 2023 11:46 AM

जळगाव :अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असतांना व्हिडीओ तयार करणा-या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ सोनू संतोष तायडे असे रावेर तालुक्यातील संशयीत आरोपी तरुणाचे नाव आहे.

रावेर तालुक्यतील अल्पवयीन मुलगी तिच्या घरातील बाथरुम मधे अंघोळ करत होती. दरम्यान तिच्या घराच्या बाथरुम वर चढून तरुणाने त्याच्या ताब्यातील मोबाईलमधे ती अंघोळ करत असल्याचा त्याने व्हिडीओ तयार करण्याचे काम सुरु केले. त्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत अल्पवयीन मुलीने त्याच्याविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पुढील तपास करत आहेत. संशयीत आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment