चेह-यावर अ‍ॅसीड टाकण्याची अल्पवयीन मुलीस धमकी

On: October 13, 2023 5:47 PM

जळगाव : तु जर मला भेटली नाही तर मी तुझ्या चेह-यावर अ‍ॅसीड टाकेन, तु माझी झाली नाही तर तुला दुस-याची देखील होऊ देणार नाही अशी धमकी देणा-याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसेन शहा नाशीर शहा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पहुर पेठ येथील तरुणाचे नाव आहे.

या घटनेतील तरुण हा एका अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करत होता. तिला शिवीगाळ करुन तु माझ्याशी निकाह करशील का? असे विचारुन तु मला बाजारात भेटत जा, तु जर मला भेटली नाही तर मी तुझ्या चेह-यावर अ‍ॅसीड टाकेल अशी त्याने तिला धमकी दिली. तु जर माझी झाली नाही तर मी तुला दुस-या कुणाची होऊ देणार नाही अशी त्याने तिला धमकी दिली. सप्टेबर महिन्यात मुलीला दिलेल्या या धमकी प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढीलतपास पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment