फसवणूकीतून चोरी करणा-या चोरट्यांना अटक

On: October 15, 2023 7:34 AM

जळगाव : वृद्ध व्यक्तीस रिक्षात बसवून त्यांच्याकडील रोख रक्कम फसवणूकीने काढून घेणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.  ईस्माईल शेख शब्बीर (रा.मास्टर कॉलनी गणेशपुरी जळगाव) आणि आरिफ सैय्यद सईद (रा.दुध फेडरेशन हुडको पिंप्राळा – जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. दोघे चोरटे जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

जामनेर शहरातील भुसावळ चौफुली थांब्यावरुन या दोघांनी वृद्ध व्यक्तीस रिक्षात बसवून त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सफौ विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, किरण चौधरी, पोना विजय पाटील, पोकॉ सचिन महाजन आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment