धारदार चाकूने पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

On: October 24, 2023 8:41 AM

जळगाव : धारदार चाकूने पतीने पत्नीवर केलेल्या हल्ल्यात पत्नीला 66 टाके पडून ती गंभीर जखमी झाली. चारित्र्यावर संशय घेत केलेल्या हल्ल्याप्रकरणी जखमी विवाहीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार जावयाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील या घटनेत विवाहीत मुलगी आणि तिची आई अशा दोघी जणी घराबाहेर अंगणात बसलेल्या होत्या. त्यावेळी विवाहीतेचा पती दारु पिऊन आला. त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत धारदार चाकूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर वैद्यकीय उपचारादरम्यान तिच्या शरीरावर 66 टाके घालण्यात आले. जखमी विवाहीतच्या आईने जावयाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अमोल पवार करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment