भुसावळ शहरात गुटखा जप्त

On: November 4, 2023 9:25 AM

जळगाव : केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा वाहतुक करतांना आढळल्या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबरच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास नॅनो कारने या गुटख्याची तापी नदीच्या पुलाजवळ वाहतुक होत असतांना कारवाई करण्यात आली आहे.

किशोर राजकुमार आगिचा रा. सिंधी कॉलनी भुसावळ याच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक नॅनो कार, 82 हजार 764 रुपये किमतीचा पान मसाला आणि 11 हजार 550 रुपये एमआरपी किंमत असलेली तंबाखूची पाकिटे असा एकुण 1 लाख 74 हजार 314 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय कंखरे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment