मशिनरीला लागणा-या साहित्याची चोरी

On: November 6, 2023 6:17 PM

जळगाव : कागद तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यासाठी लागणा-या मशिनरीचे साहित्य चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अग्रवाल यांनी एमआयडीसी परिसरातील के सेक्टर मधील भाड्याने घेतलेल्या शेडमधे ठेवलेल्या साहित्याची चोरी झाली आहे. या शेडमधे नवीन युनीट सुरु करण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार, ब्रेकर मशिन आदी साहित्य ठेवण्यात आले होते.

दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वआजेच्या सुमारास कामकाज आटोपल्यानंतर शेडला कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी सकाळी शेडला कुलूप नव्हते आणि शेडमधील सामानात कमतरता दिसून आली. या सामानातील इलेक्ट्रीक मोटारी, ब्रेकर मशीन आणी केबल अशा विविध साहित्याची चोरी झाल्याचे उघडकीस आले. या घटने प्रकरणी सिद्धार्थ अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक मुदस्सर काझी पुढील तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment