वार्ड बॉयने केला रुग्ण महिलेचा विनयभंग

On: November 15, 2023 7:31 AM

जळगाव : काहीही कारण आणि अधिकार नसतांना चक्क वार्ड बॉयने रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्ण महिलेचा अवयव दाबून तिचा विनयभंग केल्याची घटना जळगाव शहरातील दवाखान्यात घडली आहे. “संतुलन”  बिघडल्याने विनयभंग करणा-या संबंधीत वार्ड बॉय विरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील एका दवाखान्यात फर्दापूर येथील एक महिला आपल्या आरोग्याच्या संतुलनासाठी एका दवाखान्यात उपचार घेत आहे. या दवाखान्यातील निलेश नामक वार्ड बॉयने जाणून बुजून या रुग्ण महिलेस उपचाराची गरज नसतांना तिचा अवयव दाबून विनयभंग केला. महिला हे.कॉ. वंदना राठोड या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment