दरोड्याचा कट उधळत चौघांना अटक

On: November 23, 2023 10:22 AM

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सुमारे आठ ते दहा जणांपैकी चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. दिपक विसावे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

22 नोव्हेंबरच्या पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रस्त्यावरील तापी सुत गिरणीच्या पुढे असलेल्या वळणावर काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोड्याच्या साहित्यासह पोलिस पथकाला मिळून आले. दरोडेखोरांच्या ताब्यातील पिक अप वाहनात जनरेटर मशीन देखील पथकाला मिळून आली. यातील चौघांना अटक करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे पुढील तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment