सुशांतसिंग प्रकरणी एनसीबीचे पथक गोव्यात

On: August 27, 2020 11:43 AM

पणजी : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे एक पथक सुशांत सिंग राजपूत मृत्यु प्रकरणी तपासकामी गोवा येथे डेरेदाखल झाले आहेत. गोवा येथील एका हॉटेल मालकाचे या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याचा तपास करण्यासाठी हे पथक आले आहे.

गोवा येथील हॉटेल उद्योजक गौरव आर्या यांची चौकशी केली जात आहे. सुशांत याचा मृत्यू आणि अमली पदार्थ अशा अ‍ॅंगलमधून ही चौकशी केली जात आहे.
मुख्य संशयित रिया चक्रवर्तीचे व तिच्याशी सहभाग असलेल्यांचे कॉल डीटेल्स पथकाने हस्तगत केले आहे. त्या कॉल डीटेल्स मधे आर्या यांचे नाव पुढे आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment