मोटार सायकल चोरट्यास अटक

On: November 26, 2023 9:02 PM

जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. राहुल गणेश महाजन असे तांबापुरा येथील राहणा-या व अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडुन रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

दि. 23 नोव्हेंबर 2023 च्या रात्री एमएच 41 आर 2363 या क्रमांकाची मोटार सायकल महामार्गालगत असलेल्या विश्वप्रभा हॉस्पीटल जवळून चोरी झाली होती. त्या चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे.कॉ. संजय सपकाळे, हे.कॉ. जितेंद्र राजपूत, हे.कॉ. विजय खैरे, पोलिस नाईक हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलीक, विजय जाधव आदींच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या तपासकामी सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment