मोटार सायकल चोरास एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

On: November 27, 2023 10:54 AM

जळगाव : अचानक चक्कर आल्याने मोटार सायकल रस्त्याच्या कडेला लावून झोपी गेलेल्या इसमाची मोटार सायकल आणी मोबाईल चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शोधून अटक केली. सोमनाथ भागवत अहिरे असे अटक करण्यात आलेल्या कुसुंबा येथील चोरट्याचे नाव आहे.

धार्मिक कार्यक्रम आटोपून इश्वर सुभाष घुगे हे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. ते 14 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मेहरुण येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी जात होते. दरम्यान एमआयडीसी परिसरात त्यांना अचानक चक्कर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला मोटार सायकल उभी करुन ते तेथेच झोपी गेले. यावेळी त्यांची मोटार सायकल आणि खिशातील मोबाईल चोरी झाला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.   

कुसुंबा येथील रहिवासी सोमनाथ अहिरे हा चोरीची मोटार सायकल वापरत असल्याची माहिती या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना. किशोर पाटील, योगेश बारी, पोका. नाना तायडे यांना तपासकामी रवाना केले. सोमनाथ अहिरे हा एमआयडीसी परिसरातील काशिनाथ चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने मोटार सायकल आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment