महेश मांजरेकर यांना खंडणीसह धमकीचा मेसेज

On: August 27, 2020 7:34 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता महेश मांजरेकर यांना रात्री खंडणीच्या मागणीसह धमकीचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला आहे. याप्रकरणी दादर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. महेश मांजरेकर यांना काही दिवसांपासून व्हाटसअँपवर धमकीचे मेसेज येत होते. ३५ कोटी रुपये खंडणीची मागणी त्यांना केली जात होती.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या नावाने ही धमकी व खंडणी मागितली जात होती. दादर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक तपास करत आहेत. खंडणीविरोधी पथकाने रत्नागिरीतून एका जणास अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment