बीएसएनएलच्या कासोदा येथील ऑफीसमधून साहित्य चोरी

On: November 29, 2023 10:33 AM

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील बीएसएनएल कार्यालयातील विविध साहित्य चोरी झाले आहेत. त्या चोरी प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॉवर प्लेट, कम्युनिटी कॉपर प्लेट, वायरी अशा सुमारे 29 हजार 400 रुपये किमतीच्या विविध साहित्याची चोरी झाली असून या घटने प्रकरणी कनिष्ठ दुरसंचार अधिकारी योगेश कासार यांनी कासोदा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सहदेव घुले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment