बेपत्ता व्यक्तीला शोधून दिल्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस 

On: November 29, 2023 9:29 PM

नाशिक : नाशिक येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीला शोधून देणा-या त्याच्या नातेवाईकांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विठ्ठल नारखेडे असे नाशिकच्या गोविंदनगर येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस स्टेशनला 86/2023 या क्रमांकाने मिसींगची नोंद घेण्यात आली आहे.

विठ्ठल नारखेडे (वय 62) हे गेल्या सोमवार 13 नोव्हेंबर 2023 पासून गोविंदनगर नाशिक येथून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झाले त्यावेळी त्यांनी अंगात पांढरा टी शर्ट आणि काळी पॅंट परिधान केली होती. बेपत्ता विठ्ठल नारखेडे यांना थेट शोधून देणा-यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस नातेवाईकांनी जाहीर केले आहे. संपर्कासाठी  9890696851, 9370116763, 02532 593300 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नारखेडे कुटुंबियांनी केले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment