अल्पवयीन मुलाचा बळजबरी संबंधाचा व्हिडीओ

On: December 2, 2023 5:50 PM

जळगाव : अल्पवयीन मुलास बळजबरी संबंध करण्यास भाग पाडून त्या घटनेचा व्हिडीओ तयार करुन त्याला खंडणी मागण्यासह मारहाण करणा-या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यात घडलेल्या या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलगा सध्या जळगाव येथे रहात आहे.

सतरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा पाचोरा तालुक्यातील एका गावात रहात असतांना त्याला तेथील महिलेने एकासोबत बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. त्या घटनेचा त्या महिलेने व्हिडीओ तयार केला. व्हिडीओ तयार करणा-या महिलेने अल्पवयीन मुलास “तु पैसे दे नाही तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेन” अशी धमकी देत वेळोवेळी पैसे घेऊन पुन्हा पुन्हा  पैशांची मागणी केली. या प्रकाराबाबत मुलाच्या वडीलांनी संबंधीत तरुणाला विचारणा केली असता त्याच्यासह इतर दोघांनी त्यांना वाद घालून मारहाण व शिवीगाळ केली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment