वाळू माफियाविरुद्ध एमपीडीएची कारवाई

जळगाव : भडगाव तालुक्यातील एका वाळू माफिया गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संजय सुरेश त्रिभुवन रा. वाक ता. भडगाव अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

संजय त्रिभुवन याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला एक आणि भडगाव पोलिस स्टेशनला पाच असे एकुण सहा गुन्हे विविध कलमानुसार दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. भडगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शेखर डॉमाळे, पो.कॉ. प्रविण परदेशी, संदिप सोनवणे, जितू राजपूत आदींनी संजय त्रिभुवन याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी केली आहे. सदर एमपीडीए प्रस्ताव पुर्णत्वास नेण्याकामी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनुस शेख इब्राहीम व हे.कॉ. सुनिल दामोदरे आदींनी सहकार्यकेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here