ग्राहकांच्या रुपातील तिघा महिलांनी चोरी केला लाखोंचा ऐवज

On: December 15, 2023 1:08 PM

जळगाव : ग्राहक म्हणून आलेल्या तिघा महिलांनी सराफी दुकानातून रोख रकमेसह 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना चाळीसगाव शहरात सराफी दुकानात घडली. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला तिघा अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील रथ गल्ली भागात राजेंद्र रमेश वर्मा यांच्या मालकीचे राजरत्न ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानात ग्राहकाच्या रुपात 14 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तिन अनोळखी महिला वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. यावेळी दुकान मालक राजेंद्र वर्मा यांचे लक्ष विचलीत करुन आलेल्या महिलांनी दुकानातील सोने चांदी आणि रोख रक्कम असा ऐवज असलेली बॅग चोरुन नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेंद्र वर्मा यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस उप निरीक्षक माळी करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment