ठेकेदारास खंडणी मागणा-या पाच जणांविरुद्ध गुन्हा

On: December 16, 2023 9:26 AM

जळगाव : चालीसगावमे धंदा करना है तो हमको महिनेका पाच हजार रुपये देना पडेगा नही तो जानसे मार दुंगा अशी धमकी देत ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड करणा-या एकुण सात जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज खान बिस्मिल्ला खान हा तरुण ठेकेदार चाळीसगाव शहरातील कादरी नगर बिलाल चौकात राहतो. या ठेकेदार व्यावसायिकास माया उर्फ शोएब अस्लम शेख, टायगर उर्फ जुबेर आबीद पठाण, सत्तार गफ्फार शहा, चांद शेख सलिम शेख, जुनेद शेख शकिल उर्फ जे.के., नावेद व मोया वजीर शहा उर्फ मारी अशा सर्व नागद रोड चाळीसगाव येथील रहिवाशांनी पाच हजार रुपयांची खंडणी व्यवसाया सुरळीत सुरु ठेवण्यासाठी मागितली. धमकीला घाबरुन फिरोज खान याने त्यांना पाच हजार रुपये दिले.

त्यानंतर पुढील महिन्यात पुन्हा पाच हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच कार्यालयातील साहित्याची तोडफोड करुन नुकसान केल्याबाबतची फिर्याद ठेकेदार फिरोज खान याने दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला सर्व जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment